About Bhahujan Vikas Aaghadi (BVA)

बंधु-भगिनींना सप्रेम नमस्कार.....

Bhahujan Vikas Aaghadi ( BVA )

या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याशी माझे मनोगत व्यक्त करतांना मला आनंद होत आहे.

गेल्या सुमारे २५-३० वर्षातील माझ्या सार्वजनिक जीवनात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तीशी माझा संपर्क झाला. या सर्वांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, काम करणाऱ्या पद्धतीचा आणि त्या कामाच्या बऱ्या वाईट निष्कर्षांचा, मला माझी सामाजिक-सांस्कृतिक, शैक्षणिक राजकीय घडविण्यात चांगला उपयोग झाला, आणि त्यामुळे गेल्या २५-३० वर्षात माझ्याकडून जी काही समाज हिताची कामे झाली, त्यात मी निदान पास होण्यापुरते गुण मिळवू शकलो असेन असा मला विश्वास वाटतो. तीन दशकांच्या या वाटचालीत जी काही चांगली कामे असमानधारकारक झाली असतील त्याची मोठी जबाबदारी स्वत‌ःकड़े घेणे हे मी लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य मानतो. माझ्या नेतृत्वाला त्रुटींमुळेच अशी कामे यशस्वी होऊ शकली नसावीत अशी माझी धारणा आहे.

वसई-विरार परिसरात “वसई विकास मंडळ” आणि अन्य काही संस्थाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवीले जातात. विरार शहरात प्रथम शाळा, नंतर महाविद्यालय आणि आता अभिमत विद्यापीठाकडे आम्ही वाटचाल सुरु केली आहे. मीरा रोड ते डहाणू परिसरातल्या कोणत्याही शाखेतल्या विध्यार्थ्यास शिक्षणासाठी मुंबई कडे धाव घ्यावी लागू नये, हे उदिष्ट सुरुवातीपासून मनाशी बाळगून अनेक अडचणीत आणि अडथळे पार करून आम्ही ध्येयपूर्तीच्या जवळ पोहोचलो आहोत. अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे याची जाणीव मला नक्कीच आहे. आपल्या सहकार्याने हा पल्ला मी यशस्वीपणे गाठणार असा आत्मविश्वासही आहे.

शैक्षणिक क्षेत्रात ही उभारणी करत असताना आपल्या भागातला विद्याथी बैाधिक’ क्षमते बरोबरच शारीरिक आणि कला क्षेत्रातही पारंगत असला पाहिजे. हे धोरण स्वीकारून गेल्या वर्षापासून वसई कला-क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्याथ्यांच्या कला-क्रीडा गुणांचा विकास करण्याचा वसा आपण घेतला आहे. आज केवळ राज्यच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर आपल्या परिसरातल्या अनेक विद्यार्थांनी आपल्या कला आणि क्रीडा गुणाचा ठसा उमटविला आहे. याला मला निश्चितच अभिमान वाटतो. अत्यंत नेमके आयोजन असलेल्या ‘वसई कला-क्रीडा महोत्सवापासून प्रेरणा घेवून राज्यातील अनेक संस्था-संघटनानी आपापल्या परिसरात असे महोत्सव सुरु केले , हे वसई कला क्रीडा महोत्सवाचे मोठे यश आहे. शिस्तबद्ध आणि काटेकोरे आयोजनामुळे संपूर्ण राज्यात वसई कला क्रीडा महोत्सव आदर्श मानला जातो, हे ही या महोत्सवाचे वेगळेपण आहे.

केवळ विध्यार्थ्यासाठीच नव्हे तर परिसरातल्या आबालवृद्ध नागरिकानसाठीचे वेगवेगळ्या आणि आगळ्या वेगळ्या स्पर्धा आयोजित करून सर्व समाजाला मनोरंजनातून दान आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आपण अत्यंत यशस्वीपणे करीत आहोत.

आपल्या परिसरातल्या नाटक आणि संगीत प्रेमीसाठी विरार शहरात विवा महाविद्यालयात विशाल प्रांगणात तितकाच भव्य दिव्य आणि सर्व तांत्रिक बाबींना परिपूर्ण असा रंगमंच उभारण्यात आला असून त्याचा लाभ सर्वच सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था घेत आहेत. वसई-विरार परिसरात प्रेषक मंडळाची स्थापनाही करण्यात आली असून यातल्या सदस्यांन वर्षभर दर्जेदार नाटके आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आस्वाद घेता येतो. आपल्या परिसरातल्या जेष्ठ नागरिकांना आदराची सन्मानाची वागणूक देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्याच्यासाठी असलेल्या विविध योजना आणि सवलतींचा लाभ त्यांना मिळावा आणि त्याचा जीवनातआनंद फुलावा यासाठी आम्ही जेष्ठ नागरिक संघटना स्थापन करून त्याचसाठीही अनेक कार्यक्रम आणि सहली आयोजित करतो.

शैक्षणिक-सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात हे सर्वं उपक्रम राबवित असतांनाच वसई विकस आघाडी राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व सिध्द केले. राजकीय जीवनात कार्यरत असताना लोकप्रिय म्हुणुन केलेल्या सर्वच कामांना मतदारांची पसंद मिळावी आणि तब्बल वीस वर्ष वसई-विरारच्या मतदारांनी विधानसभा सदस्य म्हुणुन माझी निवड केली. मी केलेल्या कामांचीच हि पावती आहे असे मी समजावतो.

वसई-विरारच्या परिसरात अनेक वर्षापासून जाणवत असलेल्या भीषण पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी मी माझे सर्वं क्षेत्रातिल सबंध पणाला लावले, अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मी सूर्या प्रकल्पाचे पाणी माझ्या मतदारांसाठी देऊ शकलो. पाणी म्हणजेच जीवन आणि जीवनानेच माझे जीवन सार्थकि लागल्याचा आनंदी मी अनुभवतो आहे. आज वसई-विरार परिसरात भरपूर पाणी नसेल तरी आवश्यक तितके पाणी सर्वांना उपलब्ध आहे.

पाण्याच्या समस्ये बरोबरच अन्य पायाभूत सोईसुविधांचा विकस घडवून आणण्यातही मला चांगले यश मिळावे. विरार, वसई, नालासोपारा आणि नवघर – माणिकपूर या चारही नगरपालिकांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त नागरी सुविधा देण्यावर वसई विकस आघाडीने सर्वाधिक भर दिला. या चारही नगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजेच आताच्य वसई-विरार महापालिका क्षेत्रात अनेक उद्याने, नाना-नानी पार्क, तलावांचे सुशोभिकरण, भाजी आणि मासळी मंडई यांची स्वतंत्र उभारणी, ऐतिहासिक आणि अन्य महत्वपूर्ण ठिकाणाची देखभाल आणि सौंदयीकरण आणि अन्य सुखसोयी आजही आघाडीच्या उल्लेखनिय कार्याची साक्ष देतात. रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याच्या भूगर्भात साठा करणे यासाठी महापालिका नेटाने जनजागृती करीत असून जनजागृती बरोबरच नागरिकांना मालमत्ता करातून सवलतही जाहीर केली आहे. सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य केले तर पुढील अनेक दशके वसई-विरार परिसरात पाण्याची टंचाई जाणवनार नाही, याची मला खात्री आहे. मित्र हो, आशा अनेक कामाद्वारे लोकाच्या पाठिंबा वाढत गेला,वसई-विकस आघाडीची लोकप्रियता वाढला लागली. वसई-विरार प्रमाणाच आपल्याही भागात विकस व्हावा अशी पालघर,डहाणू,मनोरा आणि मीरा भायंदर परिसरातून मागणी होऊ लागली. त्यामुळे आघाडीचे काम वसई-विरार पुरतेच मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार करायचे ठरविले आणि पाहता-पाहता या सर्वंठिकाणी काम उभे’ राहिले.वसई-विकस आघाडीचे रुपांतर बहुजन विकस आघाडीत झाले आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आपण “शिट्टी” हे आधुकृत निवडणूक चिन्ह मिळाविण्यापर्यंत मजल मारली. आज बहुजन विकस आघाडीचे एक खासदार, दोन आमदार, एक महापौर , एक उपनगरध्येक्ष लोकसेवेत मग्न आहेत. या पैकी प्रत्यकजण आपल्यावर पक्षाने आणि जनतेने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेऊन आपापलेकर्तव्य बजावत आहेत.या सर्वांसह आपल्या सर्वाना बरोबर घेऊन आपला परिसर सर्वोच दृष्टीने सर्वाकृस्त बनविण्याचा माझा प्रयत्न आहे.आपल्या पालघर,लोकसभा संघातल्या अनेक समस्सांची मला जान आहे.अनेक विकासाची कामे करण्याची माझी योजना आहे.अर्थात सर्वं योजना आणि स्वप्नं आपल्या सहकार्याशिवाय साकार होणार नाहीत. याची मला कल्पना आहे.माझ्या आजवरच्या वाटचालीची यथायोग्य मूल्यमाप करून आपण माझे स्वप्नं साकार करण्यासाठी मला साथ द्याल असा मला विश्वास वाटतो.